आरमोरी मार्गावरील ठाणेगाव वळणाजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू. दुसरा तरुण गंभीर जखमी.

आरमोरी मार्गावरील ठाणेगाव वळणाजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू. 


दुसरा तरुण गंभीर जखमी.


एस.के.24 तास


आरमोरी : आरमोरी मार्गावरील ठाणेगाव वळणाजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला,तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवार, दि.21 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:00 वा.च्या सुमारास घडली.


आरमोरीहून गडचिरोलीकडे जाणाऱ्या MH.33 AC 4420  क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की दुचाकी चा चेंदामेंदा झाला असून दुचाकी वरील दोघे रस्त्यावर दूर फेकले गेले.


या अपघातात अमित प्रभाकर मेश्राम वय,26 वर्ष रा.जुगनाळा, ता.ब्रम्हपुरी.जि. चंद्रपूर याचा जागीच मृत्यू झाला.तर चेतन गोपीनाथ पिल्लेवान वय,28 वर्ष रा.जुगनाळा ता.ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.


घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी अमित मेश्राम यास मृत घोषित केले. अपघातानंतर काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.


या प्रकरणी चारचाकी वाहन चालक अंबिका बिनंद मंडल रा.दुर्गापूर,ता.चामोर्शी जि.गडचिरोली) याच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात बीएनएस २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रेमानंद लाडे करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !