गौरव कार्याचा व बालनृत्त्याने गणराज्य दिन साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथे ७७ वा गणराज्य दिन ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर सत्कार समारंभ व बालनृत्त्याने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी सरपंचा दामिनीताई चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर मूळचे अ-हेरनवरगाव येथील रहिवासी व सध्या उमरेड येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.चंद्रहास्य नंदनवार यांचा जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत नाव समाविष्ट झाले.
अ-हेरनवरगाव येथील तलाठी साजात कार्यरत असलेले ग्राम महसूल अधिकारी संजय मटाले यांचा कर्तव्यदक्ष व कार्यनिष्ठ अधिकारी,संजय जराते यांचा पर्यावरण प्रेमी , गुणवत्ता यादीत गावातून प्रथम आलेली कुमारी प्रतीक्षा सुरेश राऊत, वैनगंगा नदीतील वाळू उपसा योग्य की अयोग्य या निबंध स्पर्धेत प्रथम आलेली आरती रामपाल तुपट,
द्वितीय - रिद्धी राजेंद्र ठेंगरे यांचा सचिव रतिराम चौधरी ,सरपंचा दामिनी चौधरी , उपसरपंच जितेंद्र क-हाडे , मुख्याध्यापक मंगल धोटे, गोन्नाडे, प्रशांत राऊत,पोलीस पाटील अकुल राऊत, उपसरपंच मनोज ढवळे, तंटामुक्ती अध्यक्ष होमराज राऊत , पुनम ठेंगरे, शिल्पा क-हाडे, वैशाली ढोरे व इतर उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्ती व विजेत्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विकास विद्यालय, अ-हेरनवरगाव येथील विद्यार्थ्यांनी मनमोहक मनोरे, देशभक्तीपर संगीतावरती नृत्य करून उपस्थित मान्यवर व गावकऱ्यांची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्तिक वैद्य, शरद तलमले,सुरज मदनकार,सुरज टेंभुरकार व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार पाथोडे जिल्हा परिषद शिक्षक यांनी पार पाडले.



