क्रांती व प्रतिक्रांती समाजात रुजविणे काळाची गरज - समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा संदेश.
एस.के.24 तास
गडचिरोली : समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सुरेश मुंघाटे गडचिरोली यांच्या मुलीच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने सामाजिक प्रबोधनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी नवदांपत्य वधू लक्ष्मी व वर कृष्णकांत यांना " क्रांती आणि प्रतिक्रांती " हे विचारप्रवर्तक पुस्तक भेट स्वरूपात देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
समाजात क्रांतीकारी विचार रुजविणे व प्रतिक्रांतीच्या प्रवृत्तींविरोधात सजग राहणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. पुस्तक भेट देताना उपस्थित मान्यवरांनी सामाजिक जाणीव, समता, बंधुता व परिवर्तनवादी विचार नवदांपत्याने आपल्या जीवनात अंगीकारावेत, असा संदेश दिला.
या प्रसंगी मा.लक्ष्मण मोहुर्ले (सामाजिक कार्यकर्ते), मायाताई मोहुर्ले (प्रदेश महिला अध्यक्ष, समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य) सुनिल मोहुर्ले (जिल्हाध्यक्ष, शाखा गडचिरोली), परशुराम बोलीवार (तालुका उपाध्यक्ष,चामोर्शी), संतोष मुनघाटे, संजय पवार, सोमेश्वर मोहुर्ले, भावनाताई बोलीवार (अंगणवाडी सेविका), माधुरी मुनघाटे,सपनाताई मोहुर्ले,यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत सामाजिक चळवळीला बळ देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.

