अखिल सुतार समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने स्नेहमिलन सोहळा तसेच उपवर वधू - वर परिचय मेळावा.

अखिल सुतार समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने स्नेहमिलन सोहळा तसेच उपवर वधू - वर परिचय मेळावा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी येथील कुर्झा रोडवरील राजीव गांधी सभागृहात रविवार  दिनांक ८ फेब्रुवारी रोजी श्री प्रभू विश्वकर्मा तसेच गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून ब्रह्मपुरी येथील अखिल सुतार समाज मंडळाच्या वतीने समाज बांधवांसाठी उपवर वधू परिचय मेळावा व मनोमिलन सोहळा, तसेच ज्येष्ठ नागरिक गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार. ज्येष्ठांचे मार्गदर्शन, यासोबतच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

   


सर्वप्रथम श्री प्रभु विश्वकर्मा, श्री गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासह अन्य थोर महात्म्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन व पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर दीप प्रज्वलन आणि श्री प्रभू विश्वकर्मा यांची महाआरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रह्मपुरी अखिल सुतार समाज मंडळाचे अध्यक्ष विजय शास्त्रकार यांनी भूषवले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे नगरसेवक अनुकूल शेंडे,तर सह उद्घाटक म्हणून डॉ, सागर माकडे ब्रह्मपुरी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर झिलपे गुरुप्रसाद प्लायवडी आणि हार्डवेअर ब्रह्मपुरी, हरिदास पोटेकर, (उपाध्यक्ष सुतार मंडळ) सचिव रघुवीर रासेकर, सहसचिव तुळशीदास कायलकर, कोषाध्यक्ष उत्तम कायलकर 


कविता रासेकर अध्यक्ष महिला बचत गट, चेतना बुरडकर सचिव महिला बचत गट, कवडूभाऊ पिंपळकर (बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर) यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मनोमिलन सोहळ्याच्या निमित्त मान्यवरांनी आप-आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज शास्त्रकार यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने सुतार समाज बांधव उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !