ने.हि.महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण.

ने.हि.महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी - १९/०२/२६ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने 'शककर्ते छत्रपती शिवराय' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार कु.माहीन सलाम शेख


द्वितीय पुरस्कार किशोरी अनिल मडावी,तृतीय पुरस्कार रूपाली बाबुराव मडावी तर उत्तेजनार्थ पुरस्कार कृष्णम्माकल्याणी राऊत व ख़ुशी घोरमोडे हिने पटकावला.या प्रसंगी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा,पुस्तक व प्रमाणपत्र भेट म्हणून दिले गेले.निबंध लेखन स्पर्धेमध्ये एकूण ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

   

या जयंती उत्सव कार्यक्रम मध्ये इतिहास विभागप्रमुख डॉ.मोहन कापगते व कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्य.प्राचार्य डॉ.एस.एम शेकोकर यांनी श्रोत्यांना अनमोल मार्गदर्शन केले.या स्पर्धेच्या यशस्वीकरिता सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पद्माकर वानखडे, निबंध लेखन मूल्यमापनाकरिता डॉ.मोहन कापगते,डॉ.सुनील चौधरी, प्रा. बालाजी दमकोंडवार यांचे सहकार्य मिळाले. 

    

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्ष डॉ. सुभाष शेकोकर व सर्व सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य श्रोतृवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाला प्रा मेजर विनोद नरड,डॉ रेखा मेश्राम, डॉ राजेंद्र डांगे, डॉ धनराज खानोरकर, डॉ असलम शेख, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ योगेश ठावरी, डॉ युवराज मेश्राम,डॉ कुलजित शर्मा,


डॉ अजित खाजगीवाले,डॉ मिलिंद पठाडे,डॉ किशोर नाकतोडे, डॉ वर्षा चंदनशिवे,डॉ दर्शना उराडे,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ ज्योती दुपारे, अधीक्षक संगीता ठाकरे, रुपेश चामलाटे,सुषमा राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ पद्माकर वानखडे तर संचालन व आभार शशिकांत माडेंनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !