मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अत्याचार ; एट्रासिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी.

मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अत्याचार ; एट्रासिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी.


एस.के.24 तास 


मुल : दिनांक 24 मे 2026 रोजी,मौजा जुनासुर्ला, तहसील मूल, जिल्हा चंद्रपूर येथे अनुसूचित जातीच्या पाच नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली.या प्रकरणातील आरोपींवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (एट्रासिटी) गुन्हा दाखल करण्यात यावा.

या मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधवांनी उप विभागीय पोलिस अधिकारी, मूल यांना निवेदन सादर केले.

निवेदनाद्वारे संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडितांना न्याय व संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. समाजातील विविध घटकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत अशा प्रकारच्या जातीय अत्याचारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,अशी मागणी केली.

यावेळी ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट विनय बांबोळे , सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे, समता संघर्ष समाज परीवर्तन संघटने चे उपाध्यक्ष विजय देवतळे, सचिव किशोर नरुले

सहसचिव संदीप येनगंटीवार अटर्णी भांडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधवांनी, संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारांचे संरक्षण होणे आवश्यक असून,अनुसूचित जातीवरील अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराही दिला.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !