![]() |
| डॉ.वर्षा लहाडे जि.श.चि.सा.रुग्णालय गडचिरोली यांना सौ.सीमा कन्नमवार नगरसेविका तथा सभापती महिला बालकल्याण,न.प.गडचिरोली निवेदन देतांना... |
महिला रुग्णालयातील नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करा. - सौ.सीमा कन्नमवार नगरसेविका तथा सभापती महिला बालकल्याण, न.प.गडचिरोली
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत महिला रुग्णालयामध्ये रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देत महिला रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी सौ.सीमा कन्नमवार नगरसेविका तथा सभापती महिला बालकल्याण,न.प. गडचिरोली यांनी डॉ.वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय गडचिरोली यांना करण्यात आली.
निवेदनानुसार, रुग्णालयात सुमारे १०० रुग्णांची क्षमता असताना प्रत्यक्षात ३०० ते ३५० रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील बेड अपुरे पडत असून अनेक महिला रुग्णांना खाली झोपावे लागत आहे. काही ठिकाणी एका बेडवर दोन रुग्णांना ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
तसेच रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय स्टाफची संख्या अत्यंत कमी असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार व सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.विशेषतः गर्भवती महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिला रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून सुरू असलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून आवश्यक सुविधा,अतिरिक्त बेड व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सौ.सीमा कन्नमवार नगरसेविका तथा सभापती महिला बालकल्याण नगर परिषद,गडचिरोली केली आहे.
निवेदन देतांना,सौ.सीमा कन्नमवार नगरसेविका तथा सभापती महिला बालकल्याण नगर परिषद, गडचिरोली,शिल्पा गव्हारे (नगरसेविका तथा उपसभापती महिला बालकल्याण समिती) गडचिरोली,भुषना खेडेकर (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका उपाध्यक्ष) राणी गोपशेटवार (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका सचिव) उपस्थित होते.

