अकोल्याचे डॉ.प्रशांत महाराज ठाकरेंची ' पुस्तकाचे घरा'ला भेट : वाचनसंस्कृतीवर चर्चा.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रह्मपुरी : महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. डॉ प्रशांत महाराज ठाकरेंनी कुर्झा वार्डातील कवी,लेखक डॉ धनराज खानोरकर यांच्या 'पुस्तकाचे घरा'ला नुकतीच आपल्या संघासह भेट देऊन वाचनसंस्कृतीवर चर्चा केली.
या 'पुस्तकाच्या घरा'तील त्यांनी ग्रंथांचे अवलोकन करून या उपक्रमाचे कौतुक केले.डाॅ.खानोरकरांनी महाराजांना स्वलिखित संजोरी,ओल्या वेलीची विलांटी,आई लाॅकडाऊन म्हणजे काय? व संपादित नाटयस्पंदन स्मरणिका देऊन त्याचा गौरव केला.सोबतच शाल, श्रीफळ देऊन या प्रवचनकारांचे सत्कारही करण्यात आले.तुकडोजी महाराजांची ग्रामगीता व संत गाडगेबाबाचे समाजविचार यावर डॉ प्रशांत ठाकरे महाराजांचे सध्या महाराष्ट्राभर प्रवचन सुरू आहेत.

