रात्री वऱ्हाडींना घेऊन परतणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात होऊन 5 जणांचा जागीच मृत्यू ; 2 जण गंभीर जखमी.
एस.के.24 तास
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सौदड जवळ गुरुवारी (२३ एप्रिल) रात्री वऱ्हाडींना घेऊन परतणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. टायर फुटल्याने व्हॅनवरील नियंत्रण सुटून ती ट्रेलरवर आदळल्याने ही दुर्घटना घडली.
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील वऱ्हाडी कोंडा परिसरात लग्नसमारंभ आटोपून वऱ्हाडींना घेऊन वॅन घरी परतत असताना गुरुवारी रात्री सौंदड जवळ भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान व्हॅनचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील व्हॅन समोरील ट्रेलरवर जोरात आदळली.
या दुर्घटनेत व्हॅनमधील चार महिलांसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी असलेल्या तिघांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एकाला आढाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल तातडीने दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दुर्गा देवराम नांगरे, नैना देवराम नागरे रा. अड्याळ, श्वेता पुरुषोत्तम नागरे, तिघेही राहणार घड्याळ तसेच प्रभाकर चाचेरकर, मुन्नी प्रभाकर चाचेरकर रा.वेलतूर अशी मृतांची नावे असून रक्षा खेळकर रा.अड्याळ, स्नेहा गिरीधर नान्हे रा.अड्याळ
सोहम जागेश्वर गेडेकर रा.पिंपळगाव ही गंभीर जखमी असल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच उमेश बोडणालाल सोनवणे रा. खैरलाजी बालाघाट यांना वडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आनंदाच्या प्रसंगावर दु:खाचे सावट पसरले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

