नक्षलवादी कमांडरचे उदात्तीकरण करणाऱ्या नृत्यावरून गडचिरोली जिल्ह्यातील किरण गोमासे रा.देचली,जि.गडचिरोली येथील विद्यार्थ्यावर देशद्रोहासह गुन्हा दाखल.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : पुणे विश्रांतवाडी परिसरातील एका शासकीय वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात एका कुख्यात नक्षलवादी कमांडरवर आधारित गाण्यावर नृत्य करून त्याचे उदात्तीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.भारताची सार्वभौमता आणि अखंडता धोक्यात आणल्याप्रकरणी एका तरुणावर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किरण नारायण गोमासे वय,22 वर्ष मूळ गाव रा.देचली,जि. गडचिरोली,सध्या रा.शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार शब्बीर शेख वय,31 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 एप्रिल रोजी वसतिगृहात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता.
यावेळी आरोपी किरण गोमासे याने भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चा नक्षलवादी कमांडर आणि " पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी " च्या बटालियन क्रमांक एकचा कमांडर हिडमा माडवी याच्यावर आधारित गाण्यावर नृत्य केले.या नक्षलवाद्याचे उदात्तीकरण करून,देशाची अखंडता धोक्यात आणण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

