पो.स्टे.एटापल्ली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 14,90,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

पो.स्टे.एटापल्ली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 14,90,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास 


एटापल्ली : (दिनांक,20/04/2026) गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा¬­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 19/04/2026 रोजी पोस्टे एटापल्ली, येथील पोलीस पथकाने सापळा रचून अवैद्य दारूची वाहतुक करणा¬­या आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.


सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 19/04/2026 रोजी पोस्टे एटापल्ली येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, एका चारचाकी वाहनामधुन पोस्टे एटापल्ली हद्दीतुन देशी व विदेशी दारूची अवैध तस्करी केली जाणार आहे. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली व पोस्टे एटापल्ली येथील पोलीस पथक यांनी वेगवेगळ्या मार्गाने सापळा रचला.


संशयीत चारचाकी वाहन क्रमांक.MH.32 AS 7099 हे नारानूर, ताडपल्लीमार्गे लांझी गावात येताना दिसले. यावरून पोलीस पथकाने चारचाकी वाहन थांबवून वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये अवैध देशी व विदेशी दारु मिळून आली. त्यानंतर पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता,सदर चारचाकी वाहनामध्ये 1) रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 29 सिलबंद पेट्या व एक पेटी बिअर असा अवैद्य विक्री किंमत एकुण 2,90,000/-रुपये असा अवैद्य देशी विदेशी दारू साठा मिळून आला. 


यावरून अवैद्य देशी विदेशी दारू साठा तसेच देशी विदेशी दारु वाहतुक करीता वापरण्यात आलेली एक महिंद्रा थार चारचाकी वाहन क्रमांक एम. एच 32 ए. एस. 7099 अंदाजे किंमत 12,00,000/-रुपये असा एकुण 14,90,000/- रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 83 म.दा.का, कलम 177 मो.वा.का अन्वये 


आरोपी नामे 1) मयुर विजय बालमवार रा.वार्ड न. 7 गडचिरोली ता.जि.गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि.ज्ञानेश्वर कोल्हे पोस्टे एटापल्ली हे करीत आहेत.

   

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री.कार्तीक मधीरा,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.गोकुल राज जी.उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री.चैतन्य कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे एटापल्लीचे प्रभारी अधिकारी पोनी श्री.मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोस्टे एटापल्लीचे पोलीस पथकाने पार पाडली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !