निमगाव येथील नाल्या ऊपसा न केल्यामुळे गावकर्‍यांचे आरोग्य धोक्यात. 📍ग्राम पंचायत अधिकारी पाटील यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..!

निमगाव येथील नाल्या ऊपसा न केल्यामुळे गावकर्‍यांचे आरोग्य धोक्यात.


📍ग्राम पंचायत अधिकारी पाटील यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..!


एस.के.24 तास 


सावली : तालुक्यातील निमगाव ग्राम पंचायत येथे गावातील नाल्यांमध्ये बहुतांश ठिकाणी गाळ साचून नाल्यांमधील पाणी थांबुन सदर नाल्यांमध्ये मच्छर पैदास केंद्र होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर नाल्यांच्या सफाई करीता गावातील नागरिकांकडून सण 2024 पासुन तर आजपर्यंत तिन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज देऊनही सदर ग्रामपंचायत अधिकार्‍यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

      

त्याचप्रमाणे सदर निमगाव ग्रामपंचायत  मधील नाल्यांमध्ये वारंवार पाणी साचून असल्याने गावामध्ये मलेरीया, डेंग्यू सारख्या घातक आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आमच्या प्रतीनिधिंना हि माहिती कळताच सदर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने, त्यांच्याकडून ग्राम पंचायत विकास कामांमध्ये हलगर्जीपणा करीत असल्याचे दिसून येत आहे.


त्यामुळे प्रशासकीय वरीष्ठ अधिकार्‍यांनी निमगाव गावामध्ये विजीट देऊन गावातील समस्या जाणून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करुन गावामध्ये कसल्याही आजारांची लागण होण्याची वेळ येणार नाही.अशी उपाययोजना करावी असे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !