अ-हेरनवरगांव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव शोभायात्रा मोठ्या थाटात संपन्न.

अ-हेरनवरगांव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव शोभायात्रा मोठ्या थाटात संपन्न. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : श्रीराम देवस्थान व श्रीराम जन्मोत्सव समिती,अ-हेरनवरगांव यांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने चालत आलेली परंपरा कायम राखून याही वर्षी श्रीराम नवमी जन्मोत्सव व शोभायात्रा मोठ्या थाटात ग्रामपंचायत पटांगण येथे साजरी करण्यात आली.दिंडी भजन च्या नाच गाण्यात श्रीरामाचे रथ विधिवत पूजा करून दर्शनासाठी ग्रामपंचायत पटांगणात गावातील चार देव एकत्र ठेवण्यात आले. 



मोठ्या भक्ती भावाने लोकांनी त्यांचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले. रात्रभर चालणाऱ्या श्रीरामाच्या दर्शन येणाऱ्या भावीक भक्तांच्या मनोरंजनासाठी आणि यात्रेनिमित्त छोटे-मोठे दुकान आणणाऱ्या दुकानदारांसाठी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शाहीर निशान सुखदेवे यांच्या कोहिनूर बहुउद्देशीय सांस्कृतिक लोककला निकेतन पारडी तिरंगा निशान यांच्या राष्ट्रीय खडा तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटक मोन्टूभाऊ पिलारे नगरसेवक ब्रम्हपुरी यांनी अध्यक्ष नेताजी भाऊ मेश्राम माजी सभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी,यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष सुधीर भाऊ शिवरकर माजी उपसरपंच तोरगाव बूज यांच्या विशेष उपस्थित  आणि राकेश भाऊ पडोळे नगर सेवक ब्रम्हपुरी, अरुण भाऊ अलोने संचालक कृषी उ.बा.समिती ब्रम्हपुरी, किशोर भाऊ बगमारे  संचालक कृषी उ.बा.समिती ब्रम्हपुरी, 


नथुजी ठवरे, राजेश भाऊ तलमले बोंडेगाव, अकुल जी राऊत, होमराजजी राऊत, अमरदीपजी लोखंडे, रमेशजी ठेंगरे, संजय ढोरे,मुन्ना टेंभुरकार, दुर्वाजी खोब्रागडे,लालाजी तुपट, डॉ.खंडाईत,अरविंद जी ठेंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन केले.या कार्यक्रमाचे संचालन व आभार वामन भाऊ मिसार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.हरिश्चंद्र ठेंगरे, ईश्वर कुथे, विनीत ठेंगरे, धनु मेश्राम व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !