साहित्याच्या विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा. - डॉ.असलम शेख पदव्युत्तर मराठी विभाग कार्यक्रम.

साहित्याच्या विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा. - डॉ.असलम शेख पदव्युत्तर मराठी विभाग कार्यक्रम.

 

अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : " साहित्याचा विद्यार्थी हा इतर विषयांच्या विद्यार्थ्यांपेक्षा वेग ळा असतो.तो जीवन कसे जगावे,हे जगाला शिकवतो. कथा,कादंबरी,कविता,नाटकांतून जीवनाचे दर्शन त्याला घडते.तो त्यारुपाने संवाद साधतो.त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते, त्यामुळे साहित्याचा विद्यार्थी गुणसंपन्न असावा लागतो." असे विवेचन डॉ असलम शेख यांनी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी विभाग आयोजित कार्यक्रमात केले.

    

विचारपीठावर मराठी विभागप्रमुख,कवी डॉ धनराज खानोरकर,डॉ मोहन कापगते,डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे, डॉ राजू आदे,डॉ वर्षा चंदनशिवे,प्रा बालाजी दमकोंडवार उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पदव्युत्तर मराठी विभागातील जयश्री मोहुर्ले,अविनाश दहिकर यांनी विचार मांडले.कार्यक्रम प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

    

प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकर, संचालन विकास मुळे तर आभार संजना दोनाडकरांनी केले.यशस्वीतेसाठी प्रा स्वाती धनविजय,प्रा गौरी टिकले व पदव्युत्तर मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !