प्रा.डॉ.नोमेश मेश्राम यांच्या कविता संग्रहाला राज्य स्तरीय साहित्य विहार पुरस्कार.
एस.के.24 तास
आरमोरी : विदर्भातील प्रथितयश साहित्य प्रतिष्ठान म्हणून नावाजलेल्या नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे २०२३ या वर्षातील राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.नोमेश नारायण मेश्राम यांच्या ' रक्तफुलांचे ताटवे ' या जुलै २०२३ मध्ये राजहंस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित कवितासंग्रहाची निवड करण्यात आली.
दिनांक २६ नोव्हेंबर ला साहित्य विहार प्रतिष्ठानच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह नागपूर येथे आयोजित वार्षिक साहित्य संमेलनात त्यांना साहित्य विहार संस्थापिका आशा पांडे,प्रसिध्द मराठी कवी 'आनंदयात्री' प्रसाद कुलकर्णी मुंबई व मान्यवरांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय स्व. शामकांत कुलकर्णी राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्राप्त ४१ कवितासंग्रहामधून त्यांच्या ' रक्तफुलांचे ताटवे ' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली.
या कवितासंग्रहात त्यांनी अस्वस्थ वर्तमान,ढासळती मूल्यव्यवस्था,विविध सामाजिक चळवळींना आलेले अपयश,जागतिकीकरण,शो पीडितांच्या वेदना नावीन्यपूर्ण व स्वतःच्या अनोख्या प्रतिमा सृजनातून साकार केले असल्याचे प्रतिपादन साहित्य विहार प्रतिष्ठानने केले आहे.त्यांच्या कवितासंग्रहाला अल्पावधीतच दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजहंस प्रकाशन पुणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

