कोया पुनेम सम्मेलन व समाज प्रबोधन मेळावा अंगारा येथे १० डिसेंबरला.
एस.के.24 तास
आरमोरी : क्रातीसुर्य बिरसा मुंडा मंडळ , अंगारा चे वतीने क्रांतीविर बिरसा मुंडा जयंती निमित्य कोया पुनेम संमेलन व समाज प्रबोधन मेळावा दि. १० डिसेंबर 2023 गोंडवाना गोटुल भूमी अंगारा येथे ११ वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक सेवा निवृत्त पोलीस निरिक्षक चरणदासजी पेंदाम सह उदघाटक माजी जि.प. सदस्य नंदुभाऊ नरोटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसभापती श्रीरामजी दुगा तर ध्वजारोहन वसंतजी कुळमेथे , स्वागताध्यक्ष संजय कोकोडे , सत्कारमूर्ती मितेश्वर कोरेटी तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गोविंद टेकाम सर , सरपंच संदिप वरखडे,गणेश हलामी , नंदकिशोर नैताम , पुप्पलता कोकोडे ,रामचंद्र कांटेगे भुमक रांगी आदिची उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रमात हेमसा ग्रुप चौडमपल्ली यांचे गोंडी नृत्य सादर केल्या जाणार आहे. तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्य आदिवासी बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षश्रीराम दुगा सचिव दिपक कोकोडे अंगारा यांनी केलेले आहे.

