नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला ; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त.
एस.के.24 तास
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सक्रिय झालेल्या नक्षल्यांचा घातपात घडवून आणण्याचा डाव उधळून लावत गडचिरोली पोलिसांनी त्यांचा तळ उध्वस्त केला आहे.एटापल्ली व धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या टेकडीवर नक्षल्यांनी तळ बनवला होता.पोलीस कारवाईची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांनी पळ काढला. यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व साहित्य जप्त केले.
छत्तीसगड सीमेवरून नक्षल्यांटा गडचिरोलीत प्रवेश होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत सी- ६० जवानांनी तळ उध्वस्त करून त्यांचा डाव हाणून पाडला. या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केले आहे. – नीलोत्पल,पोलीस अधीक्षक,गडचिरोली