ट्रॅक्टर अपघातातील गंभीर जखमी यश मेश्राम ने घेतला अखेरचा श्वास.

ट्रॅक्टर अपघातातील गंभीर जखमी यश मेश्राम ने घेतला अखेरचा श्वास.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी - दिनांक २६ जानेवारी २०२६ ला सकाळी ६-००वाजे दरम्यान गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण व एनसीसी परेड साठीअ-हेनवरगांव येथून भालेश्वर येथील वर्ग मित्रासह स्कुटीने नेवजाबाई हितकारणी विद्यालय,ब्रह्मपुरी येथे जात असतांना कुर्झा बोंडेगाव रस्त्यावरती राधाकृष्ण नगरीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने जबर धडक दिली .


त्या धडकेत यशच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो आस्था हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे उपचार घेत होता.परंतु आज उपचारादरम्यान रात्रो १-००वाजता त्याचा मृत्यू झाला. वय वर्षे १४ वर्ग -९ चा विद्यार्थी.त्याच्या मृत्यूमुळे दिलीप मेश्राम याच्या कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तो आई-वडिलांना एकच मुलगा होता. 


मुलगा सैनिक होईल हे स्वप्न त्यांचे धुळीस मिळाले. यशच्या मृत्यूमुळे नेवजाबाई हितकारणी विद्यालय, तसेच अ-हेरनवरगांव व भालेश्वर गांव वासिय हळहळ व्यक्त करीत आहेत.आदर युक्त या विद्यार्थ्यांसाठी अ-हेरनवरगांवावर शोककळा पसरली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !