शिवरायांचे विचार व आचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक . - डॉ.मोहन कापगते.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,३०/०३/२०२४ " शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी आपले स्वराज्य लोकहितासाठी निर्माण केले.त्यानी निर्माण केलेले व्यवस्थापन जगातल्या नामवंत विद्यापीठात राबविण्यात येतो आहे.सर्व घटकांना त्यांनी योग्य स्थान दिले आहे, शिवरायांची जयंती कोणत्याही तिथीला साजरी केली तरी ती समाजहीताचीच ठरेल. त्यामुळे शिवरायांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत " असे विचार नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. मोहन कापगतेंनी व्यक्त केले.
ते अरेर नवरगाव येथील तिथीनुसार शिवजयंती उत्सवानिमित्त प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख,कवी डॉ धनराज खानोरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. मोंटूभाऊ पिलारे,श्री.अमरदीप लोखंडे,ऍड.हेमंत उरकुडे, वामन मिसार,रवींद्र पवार,सुभाष ठेंगरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षिय भाषणात डॉ,खानोरकरानी,शिवाजी हा प्रेरणेचा,उत्साहाचा आणि शौर्याचा विषय असून या लोकोत्तर राजाने प्रजेच्या रक्षणासाठी आपला सारा देह चंदनासारखा झिजविला, यामुळे या राजाला त्रिवार वंदन करुन त्यापासून प्रेरक प्रेरणा घेण्याची गरज आहे.असे विचार मांडले. या प्रसंगी गावातील तरुण विद्यार्थ्यांनी अफजलखान वधाच्या प्रसंगावर पोवाडा नाटिका सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अमरदीप लोखंडे यांनी केले तर संचालन,प्रा.विनीत ठेंगरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी व गावाकऱ्यांनी मोलाची मदत केली.