महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खा.अशोक नेते यांची पोर्ला येथे महत्वाची बैठक संपन्न.

महायुतीचे  उमेदवार तथा विद्यमान खा.अशोक नेते यांची पोर्ला येथे महत्वाची बैठक संपन्न.


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खा. अशोकजी नेते यांनी पोर्ला येथे भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्स यांची बैठक शिव मंदिर गडचिरोली तालुक्यातील मोठे गांव व भाजपा चा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणारा पोर्ला येथे आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी खा.नेते यांनी बैठकीला मार्गदर्शन करतांना म्हणाले गडचिरोली पंचायत समिती गणांतील पोर्ला या क्षेत्रात माझ्यावर विशेष प्रेम आहे.यावेळेस सूद्धा असावे.निवडणूक जिंकायचे असेल तर बुथ सशक्तिकरण महत्वाचे आहे.शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांनी गांभीर्याने मतदान यादीचे वाचन करावे. बुथ रचना,पेज प्रमुख, पन्ना प्रमुख यावर लक्ष देत बुथ संघटन करावे.


याबरोबरचं पुढे बोलतांना खा.नेते म्हणाले भारताची जागतिक विकासाकडे  वाटचाल सुरू आहे.मि केंद्रातुन अनेक विकास कामे खेचून आणले आहे.ज्यात रेल्वे चा प्रश्न असेल,सिंचनाचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असेल,केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प असे अनेक कामे माझ्या प्रयत्नाने मंजूर करून घेण्यात सिंहाचा वाटा आहे.एवढंच नाहीतर रेल्वे सर्व्ह लाईन चे सुद्धा काम मंजूर केलेले आहे. याबरोबरचं वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चे काम प्रगती पथावर सुरु आहे.


याप्रसंगी खा.नेते यांच्या नेतृत्वात  श्री.वाल्मिक निकूरे यांचा भाजपात पक्ष प्रवेश करत ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली.चर्चा दरम्यान गावातील समस्या जाऊन घेतल्या.


याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, माजी पं. स.उपसभापती विलास देशमुखे, महामंत्री बंडू झाडे,सामाजिक नेते प्रकाश अर्जुनवार,महिला मोर्चाच्या शहर महामंत्री अर्चना चन्नावार,अर्चना बोरकुटे,लोमेश कोलते,रमेश नैताम,उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !