जवान व नक्षल्यांत चकमक उडाली ; सात नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोलीपासून अडीचशे किलोमीटरवर हे घटनास्थळ आहे.छत्तीसगडच्या दंतेवाडा व नारायणपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाड मध्ये काही नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती छत्तीगडच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती.त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे नक्षल्यांविरोधात अभियान राबविले.यावेळी अचानक जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला.