डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : स्थानिक ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे होते. ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे सदस्य तथा शिवछत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश पिलारे 


संस्थेच्या सदस्या व समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे प्रमुख अतिथी म्हणून तर मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.मनोज चांभारे विचारमंचावर उपस्थित होते. 

         

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी महात्मा फुले व इतर महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून वैयक्तिक व सामाजिक जीवन घडवण्याचे आवाहन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री.जगदीश पिलारे यांनी सध्या देशात सुरू असलेल्या सांस्कृतिक दहशतवादावर प्रकाश टाकत महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता आचरणात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. 


प्रा.मनोज चांभारे यांनी त्या काळातील आणि आजच्या सामाजिक परिस्थितीचा तुलनात्मक आढावा घेत,महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षण चळवळीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.प्रा.डॉ. स्निग्धा कांबळे यांनी आपल्या संबोधनात स्त्रियांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून शिक्षणाचा योग्य वापर करावा असे सांगितले. 


कार्यक्रमाचे संचालन प्रा.वसुधा देवगडे, प्रास्ताविक प्रा. योगिता रामटेके तर आभार प्रा.करुणा कोसे यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !