१३५ व्या भीम जयंती चे औचित्य साधून अ-हेरवरगांव येथे पाणपोईचे उद्घाटन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : एडवोकेट हेमंत उरकुडे ब्रह्मपुरी यांच्या सहकार्याने व वामनभाऊ मिसार यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्ताने दुर्गामाता देवस्थान च्या जवळ पाणपोईचे उद्घाटन देवलालजी ठेंगरे यांनी विधिवत पूजा करून केले.
याप्रसंगी अमरदीप लोखंडे,प्रशांत दाणी ,डाकराम दोनाडकर, किशोर गाताडे,डॉक्टर हरिश्चंद्र ठेंगरे , छोटू ठाकूर,चक्रधर शिलार,पंढरी उरकुडे, श्रीधर कुथे, डाकराम ठेंगरे पाटील , अल्काबाई मडके विकणारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
दुर्गा माता देवस्थानला लागून असलेली पानपोई म्हणजेच वाटसरुने एक घुट पाणी पिला तरी समाधानाने पुढचा प्रवास सुरू करतो असे येथील जनमानसाचे मत आहे.

