स्वागत समारंभ येणाऱ्या पाहुण्यांना " दावत " साठी चक्क गोवंशाची कत्तल करत मास वाढण्याची तयारी...
★ गोवंशाचे 50 ते 60 किलो मास आढळून आला,नवरदेवासह 5 आरोपींना अटक.
एस.के.24 तास
भंडारा : लग्न आटोपले आणि दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांना " दावत " साठी चक्क गोवंशाचे मास वाढण्याची तयारी सुरू होती. मांडवाच्या मागच्या बाजूला काही लोक गोवंशाची कत्तल करत होते. त्याचवेळी या मार्गाने महाविद्यालयात जाणाऱ्या एका तरुणाने हा धक्कादायक प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ चित्रित केला.
त्यानंतर त्याने ताबडतोब विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोनद्वारे याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देत घटनास्थळ गाठले.
बजरंग दल पवनी तालुका संयोजक प्रतीक कहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३० वाजतादरम्यान बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाचा मला फोन आला. त्याने स्वागत समारंभात लोकांना जेवणासाठी गोवंशाची कत्तल केली जात असल्याचे सांगितले. शिवाय एक चित्रफितही पाठवली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून सुमारे ४० ते ५० किलो मांस, एक लोखंडी हत्यार आणि कुऱ्हाडीसह १६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.