वंश अनिल राऊत याची सैनिक स्कूल साठी निवड.

 


वंश अनिल राऊत याची सैनिक स्कूल साठी निवड.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी - २८/०२/२६ ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास विद्यालय ,अ-हेरनवरगांव येथे इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेल्या वंश अनिल राऊत याने सैनिक स्कूल प्रवेश पात्रता परीक्षेत ३०० पैकी २३७ गुण प्राप्त करून यश संपादन केले . तो चंद्रपूर येथील सैनिक स्कूल साठी पात्र ठरला.


मूळचा भालेश्वर या गावचा रहिवासी असलेला वंश सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रोज तीन किलोमीटर विकास विद्यालय,अ-हेरनवरगांव येथे शिक्षण घेण्यासाठी येत होता.त्याची सैनिक स्कूल साठी झालेली निवड ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब असून त्याचे अवलोकन इतर विद्यार्थी करतील आणि तो प्रेरणा स्त्रोत ठरेलअसे मुख्याध्यापक मंगल धोटे यांनी सांगितले व त्याचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले. 


तसेच अ-हेरनवरगांव येथील कार्तिक वैद्य,सुरज मदनकार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.बाLल वयात त्याने मनात ठाम केलेला निश्चय प्रत्यक्ष कृतीत उतरविला त्यामुळे भालेश्वर वाशीय जनता, आई-वडील यांनी त्याचे भरभरून कौतुक व अभिनंदन सुद्धा केले.


या यशाचे सर्व श्रेय भालेश्वर येथे स्कॉलरशिप पासून नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा यांचे शैक्षणिक वातावरण तयार करून स्कॉलरशिप नवोदय स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट जिल्हा परिषद शाळेचा निकाल लाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविणारे मार्गदर्शक शिक्षक भारत वाट तसेच आई, वडील यांना वंश यांने दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !