एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,01/03/2026 रविवार गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.यावरुन आज दिनांक 01/03/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पथकाने सापळा रचून अवैद्य दारूची वाहतुक करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की,आज दिनांक,01/03/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की,इसम नामे अजय चिचघरे रा.खरपुंडी, ता. जि. गडचिरोली हा आपल्या साथीदाच्या मदतीने चारचाकी वाहन क्र.UP.16.DB.0590 या वाहनाने पोमके पोटेगाव हद्दीतील अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करुन चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करणार आहेत.
यावरून सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजा नवरगाव येथे पोहचून दोन पंचासह मौजा नवरगाव येथील रहिवासी शामराव अलीवार यांचे राहते घराचे समोर सापळा रचला.यावेळी पोलीस पथकास मिळालेल्या माहिती प्रमाणे चारचाकी वाहन क्र.UP.16.DB.0590 सदर घराच्या दिशेन येत असताना दिसून आलेे. यावेळी पोलीस पथकाने अडथळा निर्माण करून वाहनास थांबण्याचा ईशारा केला.परंतु सदर वाहन चालकाने यावेळी वाहन रत्याच्या कडेला थांबवून वाहनातील 02 ईसम उतरून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
यानंतर पोलीस पथकाने सदर वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनामध्ये : -
1) रॉयल स्टॅग डिलक्स बिअर कंपनीचे 22 खरड्याचे प्रति बॉक्समध्ये 180 एम. एल. क्षमतेचे सिलबंद 48 काचेचे सिलबंद बॉटल असे एकूण 1056 काचेचे सिलबंद बॉटल विक्री किंमत 300 रु. प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 3,16,800/- रुपये,
2) 90 एम. एल. मापाचे रॉयल स्टॅग डिलक्स कंपनीचे 100 नग सिलबंद काचेचे बॉटल विक्री किंमत 150 रु. प्रति काचेचे बॉटल प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 15,000/- रुपये,
3) 01 लीटर मापाचे 23 नग सिलबंद काचेचे बॉटल विक्री किंमत 2000 रुपये प्रति काचेचे बॉटल प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 46,000/- रुपये,
4) हायवर्ड 5000 प्रिमिअम स्टोअर बिअर कंपनिचे 500 एम. एल. मापाचे 06 सिलबंद खरड्याचे बॉक्समध्ये प्रति बॉक्स 24 नग प्लॉस्टींक टिन असे एकूण 144 प्लॉस्टीक टिन विक्री किंमत 300 रु. प्रति टिन प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 43,200/- रुपये,
5) देशी विदेशी दारु वाहतुक करीता वापरण्यात आलेली एक पांढया रंगाची टाटा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक.क्र.UP.16.DB.0590 जुनी अंदाजे किंमत 8,00,000/-रुपये, असा एकुण 12,21,000/- (अक्षरी बारा लाख एकविस हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 83, 98 (2), म.दा.का. अन्वये आरोपी नामे 1) अजय चिचघरे मौजा.खरपुडी ता.जि.गडचिरोली, यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्रातील फरार आरोपींचा शोध घेणे सुरु असून, गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. सीमा किंकर, पोमके पोटेगाव ह्रा करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री.कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनी श्री.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि समाधान दौड,पोअं/रोहीत गोंगले, पोअं/प्रशांत गरफडे,चापोअं/रामदास उईनवार यांनी पार पाडली.

