वैनगंगा नदीच्या पात्रात पार्टी करणे बेतले जिवावर ; खरकाळा -पिंपळगावचे 2 तरुण गेले वाहून..!

वैनगंगा नदीच्या पात्रात पार्टी करणे बेतले जिवावर ; खरकाळा -पिंपळगावचे 2 तरुण गेले वाहून..!


एस.के.24 तास 


ब्रम्हपुरी :- तालुक्यातील सात ते आठ तरुणांनी गावानजीक असलेल्या वैनगंगा नदी तीरावर पार्टी करण्याचा बेत आखला खरी,पण सदरची पार्टी दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव - खरकाडा वैनगंगा नदीपात्रात घडली. आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


 शुभम पुष्पराज बगमारे वय,24 वर्ष व शुभम विजय सहारे वय, 19 वर्ष असे नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणांची नावे असून दोघेही चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा गावातील रहिवासी आहेत.


ब्रम्हपुरी तालुक्याच्या रणमोचन, खरकाडा व पिंपळगाव ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसलेली असल्याने बरेचसे नागरिक, महिला मंडळी तसेच तरुण-तरुणी नदी तीरावर जात असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने अनेकजण पलीकडच्या गावातून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावाकडे भाजीपाला तसेच इतर साहित्य विक्रीसाठी आणत असतात.


पिंपळगाव- खरकाडा नदी घाटावर पाण्याची पातळी नेहमी वाढलेली असते.त्याचबरोबर, त्या ठिकाणी डोह असल्याने अनेकजण पिंपळगाव- खरकाडा नदी पात्रातून जाण्याचे टाळत असतात. अश्यातच खरकाडा गावातील सात ते आठ तरुण काल रविवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदीच्या तीरावर पार्टी करण्यासाठी गेले होते.त्यानंतर काही जणांनी आपण नदी पात्राच्या पलीकडे जाऊन पार्टी करू म्हणून सर्व तरुण नदीपात्र ओलांडून कोंढाळाच्या बाजूला आले. 


सर्वांचे जेवण आटोपल्यावर परत जात असतांनाच काहीजण पिंपळगाव- खरकाडा हद्दीतील नदीपात्रात आंघोळ करत होते. राज विजय सहारे,गौरव कैलास वाघधरे, शुभम बगमारे व शुभम सहारे हे तरुण सुध्दा नदीपात्रात आंघोळ करायला उतरले. पिंपळगाव- खरकाडा हद्दीतील नदीपात्रात डोह असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम बगमारे व शुभम सहारे दोघेही तरुण वाहुन गेले. 


तर राज विजय सहारे, गौरव कैलास वाघधरे हे दोन तरुण सुखरूप बाहेर पडले. सदर घटनेची माहिती मिळताच खरकडा-पिंपळगाव गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी व आरमोरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपासकार्य सुरू केले.अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.परत आज, सोमवार 2 मार्चला शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !