महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम.

1 minute read

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, तालुका शाखा मुल  तर्फे मां. वसंत मुंडे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व मा. विश्वासराव आरोटे  सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,यांचा वाढदिवसाच्या उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रुग्णांना फळ वाटप देऊन साजरा करण्यात आला. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुल तालुका राज्य पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या जन्मदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. 



तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मुल जिल्हा चंद्रपुर कॅलेंडरचे प्रकाशन सुद्धा उपजिल्हा रुग्णालय मुलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर  कुळमेथे,  श्री संदीप धोडे मुख्याधिकारी नगर परिषद मुल, श्री राठोड संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती मुल, प्रा.महेश पानसे, विदर्भ अध्यक्ष ,सतीश राजुरवार  मुल, सावली अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मुल यांचे हस्ते करण्यात आले. 


या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश राजुरवार यांचे पिताश्री श्री मनोहरराव राजूरवार यांचा सुद्धा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मुल यांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्त रुग्णालयातील रुग्णांना फळ देऊन साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी राजेंद्र वाढई, सचिव , रोहित कामडे उपाध्यक्ष, धर्मेंद्र सूत्रपवार संघटक,प्रकाश चलाख सदस्य, हेमचंद उराडे सदस्य,तालुका उपाध्यक्ष,रोशन बोरकर सावली तालुका संघटक, विवेक दुर्योधन सदस्य, डॉ आंनदराव कुंडे, सुशांत वाळके, जितेंद्र बोरकर सावली तालुका सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ  मुंबई शाखा मुल चे सदस्य उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !