दहावी च्या परीक्षेचा निकाल मंगळवार ला (13 मे) जाहीर करण्यात येणार. 📍दहावीचा निकाल उद्या लागणार ! कुठे अन् कसा पाहाल ? Digi Locker वरून गुणपत्रिका अन् प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ?


दहावी च्या परीक्षेचा निकाल मंगळवार ला (13 मे) जाहीर करण्यात येणार.


📍दहावीचा निकाल उद्या लागणार ! कुठे अन् कसा पाहाल ? Digi Locker वरून गुणपत्रिका अन् प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ?


एस.के.24 तास 


नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती.त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते.


त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी 13 मे जाहीर करण्यात येणार आहे.एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर,विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्यांचे गुण तपासू शकतात.

विद्यार्थी त्यांचे निकाल खालील अधिकृत वेबसाइट्सद्वारे पाहू शकतात : -

mahresult.nic.in

mahahsscboard.in

results.gov.in

digilocker.gov.in

महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ ऑनलाइन कसा डाउनलोड करायचा? (How To Download Maharashtra SSC Result 2025 Online?)

  • स्टेप 1 : mahresult.nic.in ला भेट द्या
  • स्टेप 2 : ‘महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
  • स्टेप 3 : तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा
  • स्टेप 4 : तुमचा निकाल पाहण्यासाठी सबमिट करा वर क्लिक करा
  • स्टेप 5 : डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

DigiLocker वरून SSC गुणपत्रिका तपासण्याची आणि डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत Steps Check SSC Marksheet 2025 On DigiLocker)

  • स्टेप 1: digilocker.gov.in वर जा किंवा DigiLocker अॅप उघडा
  • स्टेप 2 : तुमचा मोबाइल नंबर/आधार आणि पिन वापरून साइन इन करा
  • स्टेप 3 : ‘Eductaion’ विभागात जा
  • स्टेप 4 : ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)’ निवडा
  • स्टेप 5 : ‘SSC Marksheet 2025’ वर क्लिक करा
  • स्टेप 6 : तुमची माहिती भरा आणि डिजिटल मार्कशीट डाउनलोड करा.

विद्यार्थ्यांना नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे जेणेकरून त्यांचे निकाल सहज पाहता येतील.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !