मुल तालुक्यातील भादुर्णा येथे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात महिला ठार.
📍सिंदेवाही 3 तर मुल तालुक्यात 2 एकूण 5 महिलांचा बळी.
एस.के.24 तास
मुल :जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून सलग तिसऱ्या दिवशी मुल तालुक्यातील भादुर्णा येथे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या भूमिका दिपक भेंडारे वय,30 वर्ष या महिलेवर वाघाले हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यु झाली.
3 दिवसात वाघाने घेतलेला हा 5 वा बळी आहे.दरम्यान या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला.या जिल्ह्यात मागील तीन दिवसात वाघाचे हल्ले वाढले असून सिंदेवाही व मुल या दोन तालुक्यात 5 महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत.
वाघाची दहशत व भिती सर्वत्र आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात.मुल तालुक्यातील भादुर्णा येथे ही आईच्या घरी वास्तव्याला असलेली भूमिका दिपक भेंडारे सकाळी 8:00 वा.च्या सुमारास तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली होती.यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यात भूमिकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला.
या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी संतप्त ग्रामस्थानी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा भमिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता.
वन अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त करून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. तर काही ग्रामस्थांनी रागाच्या भरात जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला.वन विभागाच्या अधिकारी व पथकाने वेळीच ग्रामस्थांना मज्जाव केल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जाणे आता कठीण झाले आहे. तेंदूसाठी जंगलात गेले तरी परत येणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.