पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न. 📍अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.एम.रमेश यांच्यासह मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त 138 पैकी 40 अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानचिन्ह प्रदान.

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न.


📍अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.एम.रमेश यांच्यासह मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त 138 पैकी 40 अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानचिन्ह प्रदान.


एस.के.24 तास 


गडचिरोली : दिनांक,01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून 01 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.आज पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.यतिश देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम ठिक 06.45 वा. पार पडला.  



यावेळी सर्वप्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच दिनांक 01 मे 2019 रोजी मौजा जांभुळखेडा ते कुरखेडा मार्गावर माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहीद वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.सन-2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलातील 138 अधिकारी/अंमलदार यांना मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहिर झाले आहे. 



त्यापैकी 35 अधिकारी व अंमलदार यांना प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला. 

तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मनोगतादरम्यान गडचिरोली पोलीस दलाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार,मंत्रालयीन स्टाफ व शहीद कुटुंबीय यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थित शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेतल्या. 


त्याचबरोबर पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे मा. वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री म. रा. तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांचे हस्ते व मा. जिल्हाधिकारी गडचिरोली श्री. अविश्यांत पंडा, प्रभारी पोलीस अधीक्षक, गडचिरोली व इतर वरिष्ठ अधिका­यांच्या उपस्थितीत सकाळी 08.00 वा. ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

त्यानंतर मा. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्यासह इतर चार अधिकारी व अंमलदार यांचा मा. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या समक्ष गडचिरोली पोलीस दलाकडून पथसंचलन सादर करण्यात आले. 


कार्यक्रम प्रसंगी प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम.रमेश,पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप, प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री. हर्षल अेकरे व इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.


सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !