ने.हि.महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी (कार्य.)डॉ.सुभाष शेकोकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०१/०५/२५ येथील प्रतिथयश नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी (कार्य.) शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहिलेले डॉ सुभाष शेकोकरांची निवड करण्यात आली.
नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया, सदस्य गोपालजी भैया,कला शाखाप्रमुख डॉ राजेंद्र डांगे, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ रेखा मेश्राम,अधीक्षक संगीता ठाकरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक प्रा.विनोद नरड व महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे कडून पदभार स्वीकारल्यानंतर ते महाविद्यालयाच्या कार्य. प्राचार्यपदी विराजमान झाले.
संस्थेचे सचिव अशोकजी भैया व संस्थेचे सदस्य गोपालजी भैयांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.आपल्या काळात महाविद्यालय भरभराटीस यावे,अशी मनोकामना व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच गहाणे ३० एप्रिल २०२५ ला सेवानिवृत्त झाले.यानिमित्त या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संचालन डॉ.मोहन कापगते तर आभार डॉ.धनराज खानोरकरांनी मानले.यावेळी नवनियुक्त कार्य.प्राचार्यांचे पुष्पगुच्छ देऊन अनेकांनी अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.