घराशेजारी असलेल्या विहीरीत रात्रीच बिबटया पडला ; बाहेर पडता न आल्याने त्याचा विहीरीतच मृत्यू.
एस.के.24 तास
चंद्रपूर : विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू झाला.ही घटना बुधवारी सकाळी आगडी येथे उघडकीस आली.आगडी येथील बाबूराव निकोडे यांचे घरा शेजारी असलल्या विहीरीत रात्रीच बिबटया पडला.बाहेर पडता न आल्याने त्याचा विहीरीतच मृत्यू झाला.मरण पावलेला बिबट नर जातीचा आहे.अंदाजे बिबट 5 वर्षाचा होता.
आगडी येथील बााबूराव निकोडे हे सकाळी गाईच्या गोठयाकडे गेले असता त्यांना विहीरीत बिबब्या पडल्याचे लक्षात आले.याची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली.
माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक नायगमकरए वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके,क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पडवे, सदस्य मुकेश भांदककर, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार वनरक्षक,अनिल नालमवार हे घटनास्थळी दाखल होऊन मोका पंचनामा केला व मृत बिबट विहरीतुन काढुन शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर ला पाठवण्यात आले.
शिकारीच्या मागे धावताना बिबट विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.