गांधी चौक गडचिरोली येथे सुरजागड लोह खनीज नेणाऱ्या भरधाव ट्रकचा दुचाकीला धडक ; मुल च्या युवकाचा जागीच मृत्यू.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,25 मे 2025 रविवार ला सांयकाळी 6.30 वा.चे दरम्यान सुरजागड वरून लोह खनीज घेऊन छतीसगड जाणारी ट्रक चामोर्शी रोड ते धानोरा कडे टर्निंग घेत असतांना आरमोरी वरून धानोरा रोड कडे जाणारी दुचाकी ला ट्रक क्रं.MH.34 BG 7135 DNR च्या मालकीची धडक दिल्याने गणेश चौधरी वय,28 वर्ष मुल हा ट्रकच्या चाकात पडून जागीच ठार झाला.
गणेश चौधरी मुल हा त्याचा मित्र राहुल याला भेटायला आला होता.गणेश हा खादी ग्रामोद्योग चंद्रपूर येथे नोकरीवर होता.आज रविवार सुट्टी असल्याने तो मित्राला भेटायला गडचिरोली आला होता.ड्रायव्हर अपघात झाल्यावर स्वतः पोलीस स्टेशन गडचिरोली येथे हजर झाला.
सुरजागड लोह खनीजाचे ट्रक या मार्गाने बंद करू. पोलीसांनी आवागमन करणाऱ्या गाड्यांच्या स्पिडवर नियंत्रण ठरवावे.अशी मागणी होत आहे.सकाळी याच जागेवर अपघात घडला होता.एकाला दवाखण्यात भरती करण्यात आलेले आहे.अशी माहिती आहे.