" हर घर संविधान " उपक्रमांतर्गत नवदांपत्याला संविधान ग्रंथाची भेट.

" हर घर संविधान " उपक्रमांतर्गत नवदांपत्याला संविधान ग्रंथाची भेट.


एस.के.24 तास


गडचिरोली : मारोडा (पोटेगाव),२३ मे २०२५ – शुक्रवार मौजा मारोडा (पोटेगाव) येथे पार पडलेल्या देवतळे-लाटेलवार यांच्या विवाह समारंभात समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.


संघटनेच्या "हर घर संविधान" या जनजागृती उपक्रमाअंतर्गत नवदांपत्याला भारतीय संविधानाचा ग्रंथ भेट म्हणून प्रदान करण्यात आला. विवाहासारख्या पवित्र आणि आनंदाच्या प्रसंगी नवविवाहितांना संविधान भेट देऊन त्यांना लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न उपस्थितांच्या विशेष लक्षात राहिला.


सादर कार्यक्रमात वर-तिलकसागर, वधू-अलका, पूनाजी देवतळे, रेखा देवतळे, श्रावण लाटेलवार, मिराबाई लाटेलवार,  तसेच समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण मोहूर्ले, विजय देवतळे, संदीप येनगंटीवार, परमेश्वर मोहूर्ले,  भैय्याजी बोलिवार,  टिकाराम लाटेलवार, रामदास देवतळे तसेच ग्रामस्थ आणि वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !