कु.अमृता संजय लांबे यांना पीएच.डी.पदवी प्राप्त.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२४/०५/२५ सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान,सुरत येथे ईलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग मध्ये The Koopman operator approach to nonlinear control problems and its comparison with the Carleman embedding, या विषयात शोधप्रबंध सादर करुण आचार्य पदवी प्राप्त केली.
यासाठी सहाय्यक प्रोफेसर डॉ.हिरेन जी.पटेल व प्रोफेसर डॉ.एस.एन.शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.संशोधनाच्या कालावधीत ४ जरनल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले.
संशोधन क्षेत्रात पुढे कार्यरत राहण्याचा मानस आहे. या यशाबद्दल डॉ. अमृता संजय लांबे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत प्रा. संजय लांबे व सौ. अनिता लांबे यांची कन्या होय. ती आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक, प्राध्यापक वृंद व परिवाराला देते.