चांदली (बुज) येथे कुरमार/धनगर समाज बांधव यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी त्रिशताब्दीय जयंती साजरी.

चांदली (बुज) येथे कुरमार/धनगर समाज बांधव यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी त्रिशताब्दीय जयंती साजरी.


एस.के.24 तास


सावली : चांदली बुज येथे कुरमार/धनगर समाज बांधव यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात स्थानिक समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.



सायंकाळी इ १० वी मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून कुमारी.सलोनी राजू मर्लावार इच्छा हस्ते  पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पाच वाजता मिरवणूक काढण्यात आले.यावेळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 


परंपरागत वेशभूषेमध्ये गावातील संपूर्ण महिला युवक युवती व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. डोल व मंझीर च्या तालावार  गावातील प्रमुख चौकातून मिरवणूक निघाली.येळकोट येळकोट जय मल्हार,अहिल्यादेवी की जय असा उद्घोष करीत उत्साहात मिरवणूक पार पडली. मिरवणूक निघाली. 


वाल्मिकी चौक,हनुमान मंदिर चौक,बिरसा मुंडा चौक,सावित्रीबाई फुले चौक,असे अहिल्यादेवी होळकर चौकात मिरवणुकीचे समारोप करण्यात आला.गावातील नागरिकांनी मिरवणुकीला चांगला प्रतिसाद दिला.व इयता १० वी व १२ वी च्या गुणवंत  विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.


गावातील चिमुकल्यानी अहिल्यादेवी ची वेशभूषा साकारली व जय मल्हार घोषणा देत सर्वांचे लक्ष  वेधले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठलजी येग्गावार  संरपंच ग्रा.पं,चिंतामन बालमवार पोलीस पाटील,गंगाजी मर्लावार समाज प्रमुख,गणेश करेवार समाज प्रमुख,व बालाजी आरेवार,मल्लेश अमृतवार,पंकेश कन्नावार राजेश्वर रामेवार,प्रशांत मुद्रीवार,गणेश मर्लावार,अनिल अमृतवार,मंगेश कन्नावार,पांडुरंग अमृतवार,अतुल मिडपलवार,रुपेश कंकलवार व सर्व युवा वर्गानी  सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !