जागतिक सायकल दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन.
📍सायकल रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य - 300 हून अधिक पोलीस अधिकारी / अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक / युवती व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग.
एस.के.24 तास
गडचिरोली : दि.03/06/2024 संयुक्त राष्ट्रसंघाने सन - 2018 पासून 03 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केलेला आहे. तेव्हा पासून 03 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. सायकल ही साधी, परवडणारी, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल असे शाश्वत वाहतुकीचे साधन आहे.
तसेच नेहमीच सायकल चालविणे शरीर स्वास्थासाठी फायदेशिर आहे. लोकांमध्ये आरोग्य स्वास्थ्य विषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी व अधिकाधिक लोकांनी सायकलीचा वापर करावा यासाठी दरवर्षी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो.
जागतिक सायकल दिनाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दि. 03 जून 2025 रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते इंदिरा गांधी चौकपर्यंंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल,
अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन/अभियान) श्री. एम. रमेश तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे व पोलीस अधिकारी/अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक/युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थींनींनी सायकल रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व शेवटी या सायकल रॅलीचा शहिद पांडु आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सर्व सहभागी सायकल स्वारांना पोलीस दलाकडून सहभागी प्रमाणपत्र देऊन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, सायकल चालविल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात संरक्षण होते.
आठवड्यातून किमान दोन दिवस जरी एक तास सायकल चालवली तरी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तसेच आपल्या शारीरिक तंदुरुस्ती बाबत आपल्याला जाणीव होते. तसेच यावेळी पोलीस अधीक्षक यांनी आपल्या निरोगी जीवनासाठी सर्वांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहीत करुन सायकलचा वापर करण्याबाबत आवाहन करुन जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम संपल्यावर सर्व सहभागींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन/अभियान) श्री.एम. रमेश तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री.विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.