आगामी न.प.निवडणुकीसाठी नवीन मतदारांनी नोंदणी करा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष.प्रा.सुयोग बाळबुधे यांचे मतदारांना आवाहन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१५/०६/२५ आगामी काही दिवसात ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुका तोंडावर असतांना निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी सुरू केली आहे. याच पारश्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी च्या वतीने ब्रह्मपुरीचे माजी आमदार भाजपा नेते प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेता प्रा. सुयोग बाळबुधे यांनी नवीन मतदारांनी नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.
प्रा. बाळबुधे म्हणाले की, 18 वर्षांवरील सर्व तरुणांनी आपला मतदार नांव नोंदवणे गरजेचे असून त्याचा वापर योग्य उमेदवार निवडण्यासाठी करावा. मतदार नोंदणी ही एक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून त्याद्वारा जनभावना व प्रश्नांवरील भूमिका व्यक्त करता येते,असे त्यांनी नमूद केले.
माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणीचे काम सुरू असून अधिकाधिक तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, असेंही त्यांनी म्हटले. या बाबत नोंदणी करिता 9823339788 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रा.सुयोग बाळबुधे यांनी केले आहे.