पैशांच्या वादातून अल्पवयीन मुलाची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या. 📍गुरवळा नदी परिसरात आढळला युवकाचा मृतदेह ; 3 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

पैशांच्या वादातून अल्पवयीन मुलाची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या.


📍गुरवळा नदी परिसरात आढळला युवकाचा मृतदेह ; 3 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.


एस.के.24 तास 


गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरवळा नदी परिसरातील जंगल भागात एका अल्पवयीन मुलाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.28) उघडकीस आली.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पैशांच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बादल नकटुजी कोसनकर वय,17 वर्ष रा.डोंगरगाव ता.जि.गडचिरोली असे मृत मुलाचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,27 मे रोजी दुपारी 1:30 ते 2:00 च्या दरम्यान ही घटना घडली.बादल कोसनकर याला काही जणांनी गडचिरोली ते गुरवळा मार्गावरील जंगल परिसरात गाठले. पैशांच्या देणे - घेण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. 

आरोपींनी धारदार कुऱ्हाडीने बादलच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार करून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

गुरुवारी सकाळी गुरवळा नदी परिसरात मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.

या प्रकरणी कार्तिक मुकेश देशमुख वय,16 वर्ष याने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी " अभि " नावाचा एक संशयित आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती असे एकूण 3 आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल दाखल केला आहे. 

मपोउपनि पूजा नैताम यांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, या घटनेतील संशयित आरोपींची ओळख पटवण्यासह पुढील तपास पोउपनि प्रवीण बुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गुरवळा नदी परिसरात अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे स्थानिक गावकरी हादरून गेले आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !