स्वामी विवेकानंद संस्कार वर्ग ब्रह्मपुरी च्या वतीने सात दिवसीय कीर्तन शिबिरास सुरुवात.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - १९/०६/२५ ब्रह्मपुरी येथील विठ्ठल मंदिर सभागृह येथे स्वामी विवेकानंद संस्कार वर्ग च्या वतीने दि.१८ ते २४ जून २०२५ या काळात सात दिवसीय कीर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. कीर्तन शिबिराचे हे १८ वे वर्ष आहे.यात ०६ वर्षे ते ७० वर्षे वयोगटातील ४७ शिबिरार्थी कीर्तन अभ्यासासाठी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी व जवळच्या परिसरातून आलेले आहेत.
या कीर्तन शिबिराचे आयोजन सौ. सविताताई जयंत खरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.यात नारदीय , वारकरी, राष्ट्रीय कीर्तन प्रकार शिकविण्यात येणार आहेत.ह.भ.प. सचिन काळे महाराज, कळमेश्वर हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत.योगाभ्यास, संगीत शिक्षण, गायन वादन, सराव, उपासना सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, संस्कृत श्लोक अभ्यास, बौद्धिक, संवाद या विषयांचा अभ्यास करण्यातयेणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन बुधवार दि.१८ जून रोजी झाले. यावेळी उद्घाटक आद. तनयजी देशकर, आद. ईश्वरजी प्रधान, आद. सचिन महाराज काळे, कळमेश्वर, आद. साकेतजी भानारकर, उपस्थित होते. त्यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा देत कीर्तन शिबिराची सध्याच्या काळात संस्कृती संवर्धनासाठी अधिक गरज आहे.असे विचार व्यक्त करीत शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अनेक पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी च्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.