डॉ.आंबेडकर महाविद्यालयात योगा दिन साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२१/०६/२५ आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे झाले आहे.कामाच्या व्यस्ततेमुळे आणि ताणतणावामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललं आहे. परिणामी अनेक आजारांनी शरीराला वेढलं जात आहे. यामुळे मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे आजच्या घडीला महत्वाचे झाले. निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी योगा करणे खुप गरजेचं आहे.
कारण योग असे माध्यम आहे, जे धकाधकीच्या जीवनात शरीर तंदरूस्त ठेवू शकते. शिवाय योगामुळे मनावरही चांगले संस्कार होतात. म्हणून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी आपण ११वा आतंरराष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आहोत.स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ६.00 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पतंजली योग समिती ब्रह्मपुरी चे पूजा येरणे, मिथिला राऊत , डॉ.रामेश्वर राखडे , जितेंद्र कुथे, भालचंद्र नाकाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे कार्यक्रमास सुरुवात झाली.
सर्वप्रथम पतंजली योग समितीच्या उपस्थित सभासदांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवजी कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवेशजी कांबळे यांनी “ एक पृथ्वी, एक आरोग्य ” या थीमच्या माध्यमातून निसर्गाचा आदर करावा , कारण आपले आरोग्य हे पृथ्वी ग्रहाच्या आरोग्याशी जोडलेले आहे. त्यामुळे जर आपण आपल्या ग्रहाचे रक्षण केले नाही तर आपण निरोगी राहू शकत नाही.
कारण पृथ्वी वर असलेली हवा, पाणी तसेच आपण खातो ते अन्न या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याची आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाचे महत्त्व विशद केले. उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी युनिटचे २४ कॅडेट्स , एन एस एस चे विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन दोन तास योगासने केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट सरोज शिंगाडे, शारीरिक शिक्षक विभाग प्रमुख प्रा. बुरखुंडे , एन एस एस अधिकारी प्रा.राजेश कोसे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. बुरखंडे सर यांनी तर आभार लेफ्टनंट सरोज शिंगाडे यांनी मानले.