भावाच्या मृत्यूनंतर वहिनीसोबत प्रेमसंबंध,दिराने झोपेतच भावजयीचा गळा चिरून केला खून; लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना. 📍मृत महिला व आरोपी गौरव अंबादे ब्रह्मपुरी चे आहेत सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

💥 भावाच्या मृत्यूनंतर वहिनीसोबत प्रेमसंबंध,दिराने झोपेतच भावजयीचा गळा चिरून केला खून; लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना.


📍मृत महिला व आरोपी गौरव अंबादे ब्रह्मपुरी चे आहेत सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.


एस.के.24 तास 


लाखांदूर (भंडारा) : नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे समोर आली आहे. ब्रह्मपुरी येथील एका ३० वर्षीय महिलेची तिच्याच दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी (दि.२६ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.


माधुरी तुळशीदास अंबादे (वय ३०,रा.ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गौरव अंबादे (वय २५,रा.ब्रह्मपुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.


नेमकी घटना काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी अंबादे ही आपली ८ वर्षांची मुलगी जान्हवी आणि दीर गौरव अंबादे याच्यासह पालांदूर येथे एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. तिथून परत येत असताना उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील नातेवाईक नाजुका गणवीर यांच्या घरी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायला गेले.


रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास, जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा आरोपी गौरवने क्रूरतेचा कळस गाठला. त्याने आधी माधुरीचे पाय स्कार्फने बांधले आणि तोंड उशीने दाबले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. ही संपूर्ण घटना मृत माधुरीच्या लहान मुलीसमोर घडल्याचे समजते.


हत्येमागचे कारण काय ?


पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या प्रेमसंबंधातून झाली असावी असा संशय आहे.माधुरी यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते.आरोपी गौरवचे माधुरी सोबत कथित प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.गौरवने लग्नासाठी तगादा लावला होता,माधुरीने त्यास नकार दिला होता.याच कारणावरून आरोपीने अन्यत्र विवाह करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा माधुरीनेही त्याचा एक विवाहसंबंध मोडल्याची चर्चा परिसरात आहे. याच वैयक्तिक वादातून हा टोकाचा पाऊल उचलला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


मुलीचा टाहो आणि आरोपीचा पळ : - 


आईवर होत असलेला हल्ला पाहून चिमुरडी जान्हवी हिने हंबरडा फोडला.तिच्या रडण्याचा आवाज ऐकून घरमालक जागे झाले,तोपर्यंत आरोपी गौरव दुचाकीवरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.ठाणेदार सचिन पवार आणि सहाय्यक ठाणेदार आशिष गंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !