दुःखद गडचिरोलीचे ज्येष्ठ व निष्ठावान वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.शिवनाथजी कुंभारे यांचे निधन.

दुःखद गडचिरोलीचे ज्येष्ठ व निष्ठावान वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.शिवनाथजी कुंभारे यांचे निधन.


एस.के.24 तास 


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक आधारस्तंभ आणि प्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पिटलचे (कुंभारे हॉस्पिटल) मुख्य संचालक डॉ.शिवनाथजी कुंभारे यांनी आज, 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात आणि वैद्यकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.


डॉ.कुंभारे यांनी आयुष्यभर एकनिष्ठेने रुग्णसेवा केली. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.धन्वंतरी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना उपचार देऊन जीवदान दिले. केवळ एक डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर एक अत्यंत साधे, निष्ठावान आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.


आज त्यांच्या जाण्याने गडचिरोलीने एक निस्पृह सेवाव्रती आणि अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज सायंकाळी 6.00 करण्यात येणार आहेत.त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली...!💐💐💐

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !