सावली तालुक्यातील चारगाव नदी जवळ शेतीच्या वादातून तलवारीने वार केल्याने युवक गंभीर जखमी. 📍आरोपी कुणाल आडे याला सावली पोलिसांनी केली अटक.

सावली तालुक्यातील चारगाव नदी जवळ शेतीच्या वादातून तलवारीने वार केल्याने युवक गंभीर जखमी.


📍आरोपी कुणाल आडे याला सावली पोलिसांनी केली अटक.


एस.के.24 तास


सावली : चारगाव येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात नरेश कृष्णा आडे वय,27 वर्ष हे तलवारीच्या वाराने गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कुणाल अनिल आडे वय,23 वर्ष याला अटक केली आहे.


ही घटना रविवारी दिनांक,1 जून 2025 ला सायंकाळी सुमारे 7:00 वा.च्या सुमारास घडली. नरेश आडे हे एका लहान मुलाला दुचाकीवर बसवून डिझेल कॅन आणत असताना चारगाव नदी जवळ दबा धरून बसलेल्या कुणाल आडे ने तलवारीने नरेश च्या डोक्यावर हल्ला केला.


अचानक झालेल्या या हल्ल्यात नरेश गंभीर जखमी झाले.तर त्यांच्या सोबत असलेला लहान मुलगा गाडी वरून खाली पडला.त्याने तात्काळ पुलाचे काम करणाऱ्या मजुरांना आवाज दिला. घटनास्थळी धाव घेताच मजुरांच्या मदतीने आरोपी तेथून पळून गेला.


घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले व काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले.प्राथमिक चौकशीत हल्ल्याचे कारण शेतीच्या वादातून निर्माण झालेली वैमनस्यता असल्याचे समोर आले आहे.तसेच आरोपी कडून या पूर्वीही इतर काहींना मारण्याच्या धमक्या दिल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !