डॉ.आंबेडकर महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा.

डॉ.आंबेडकर महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : दिनांक,०६/०६/२५ डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था,चांदा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे एन. सी. सी. गर्ल्स युनिट यांच्यावतीने वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. 



०३महाराष्ट्र गर्ल्स बटालियन चे कमांडींग ऑफिसर कर्नल राजीव भोला आणि ए.ओ.मेजर ममता शंकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. 


पर्यावरण दिनानिमित्त एन.सी.सी. गर्ल्स  युनिट च्या वतीने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व ०३महाराष्ट्र गर्ल्स युनिटच्या वतीने  पर्यावरणाचे संवर्धन या विषयावर पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली. तसेच पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा हे स्लोगन देत जनजागृती करिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाची औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणासंबंधी चे मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमास महाविद्यालय प्राध्यापक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ०३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी युनिट चे २९ कॅडेट्स उपस्थित होते. सदर कार्यक्रम लेफ्टनंट प्रा. सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !