कोरची तालुक्यातील मसेली येथे गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक झाडावर आदळला ; चालकाचे दोन्ही पाय तुटले.

कोरची तालुक्यातील मसेली येथे गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक झाडावर आदळला ; चालकाचे दोन्ही पाय तुटले.


एस.के.24 तास


कोरची : कोरची पासून सुमारे 8 किमी अंतरावर असलेल्या मसेली रस्त्यावर आज सकाळी 10.30 च्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.मोटार सायकल स्वार आणि अचानक रस्त्यावर आलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक झाडाला आदळला.


या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय तुटले आहेत.अपघात ग्रस्त ट्रक क्रमांक CG 08AZ2660 हैदराबाद इथून झारखंड कडे टाॅवर उभारणीचे साहित्य घेऊन निघाला होता. 


अपघातात चालक संतोषकुमार साहु वय,46 वर्षे रा. रायपूर यांचे दोन्ही पाय तुटले आहेत तर कंडक्टर नरेंद्र मदनलाल साहू वय,18 वर्षे रा.गिदवाहभवर ता.छुर्या जिल्हा राजनांदगांव याच्या चेहऱ्याला,पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत.


घटनेची माहिती मिळताच कोरची ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी च्या साहाय्याने ट्रक मधून जखमींना बाहेर काढण्यात आले.नंतर 108 रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ.अनिकेत राऊत यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात रेफर केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !