नागभीड तालुक्यातील मेंढा (किरमिटी) येथील शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या.
एस.के.24 तास
नागभीड : तालुक्यातील मेंढा (किरमिटी) येथील शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.विनायक हरीजी कोरे वय,५२ वर्ष असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.गुरुवारी शेतात धानाचे पर्र्हे टाकायचे आहेत.असे घरी सांगून विनायक बुधवारी संध्याकाळी शेतावर गेला होता.
मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेतला पण कुठेही दिसून आला नाही. गुरुवारी सकाळी गुराखी शेळ्या चारण्यासाठी विनायकच्या शेताकडे गेले असता विनायक शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. गुराख्यानी लागलीच ही माहिती घरच्यांना दिली. पोलिसांनाही कळविण्यात आले.