नोकरीचे आमिष ब्रम्हपुरी तालुक्यातील बेरोजगारांनाही दहा लाख रुपये नी गंडा ; रोषनी रोमल नाकतोडे विरूद्ध गुन्हा दाखल. 📍वडसा,कुरखेडा येथील शासकीय रुग्णालायत वार्ड बॅाय व गडचिरोलीत शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे असे खोटे सांगून आर्थिक लूटमार करून नोकरीवर लावून देण्याचे तिने आश्वासन.

नोकरीचे आमिष ब्रम्हपुरी तालुक्यातील बेरोजगारांनाही  दहा लाख रुपये नी गंडा ; रोषनी रोमल नाकतोडे विरूद्ध  गुन्हा दाखल.


📍वडसा,कुरखेडा येथील शासकीय रुग्णालायत वार्ड बॅाय व गडचिरोलीत शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे असे खोटे सांगून आर्थिक लूटमार करून नोकरीवर लावून देण्याचे तिने आश्वासन.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून येथील एका दाम्पत्याने लाखांदूर तालुक्यातील बेरोजगार तरूणांची फसवणूक केली. ही घटना ताजी असताचा याच बंटी - बबलीने ब्रह्मपुरी तालुक्यातील बेरोजगारांना सुद्धा आपल्या सापळ्यात अडकविल्याचे समोर आले.


ब्रम्हपुरी शहरालगतच्या मालडोंगरी एका बेरोजगाराची दहा लाख रुपयांनी फसवणूक केली.नोकरी लावून देतो, असे सांगून त्यांच्याकडून या जोडीने पैसे घेतले.सौरभ प्रफुल पारधी (वय २२) असे पिडीत युवकाचे नाव आहे. शहरातील विदर्भ इस्टेट कॅालनीतील रोशनी रोमल नाकतोडे (वय २९ ) यांना तो मागील तीन वर्षांपासून दूध पोचवायचा.त्यामुळे त्याची आणि रोशनीची चांगली ओळख झाली.


तिने सौरभाला विश्वासात घेतले.मी स्वतः गडचिरोलीत शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे. सासरे खुशाल नाकतोडे बांधकाम विभागात आहे.मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत ओळखी आहे.स्वतःच्या मेहूणी आणि बहीणीला नोकरी लावून दिल्याचे सांगून सौरभचा विश्वास जिंकला. नोकरी लावून देता असे सांगून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये उकळले. 


त्यानंतर सौरभने त्याचा मित्र अनिल करंबे (वय २२, याचीही नोकरीसाठी ओळख करुन दिली.वडसा,कुरखेडा येथील शासकीय रुग्णालायत वार्ड बॅाय म्हणून नोकरीवर लावून देण्याचे तिने आश्वासन दिले.दहा लाख रुपये या दोघांनी तिला दिले. मात्र नोकरी मिळाली नाही.


 त्यामुळे सौरभ आणि त्याचा मित्र करण तिच्या घरी गेला. तेंव्हा घराला कुलूप दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपी रोषनी रोमल नाकतोडे विरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


सौरभ चा विश्वास जिंकण्यासाठी तिने बॅंक ऑफ बडोदाचा कोरा धानदेश त्याला दिला. तिच्यावर विश्वास सौरभच्या वडिलांनी अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी रोशनीने सौरभ आणि त्यांच्या मित्राकडून पैसे उकळले. एक लाख ५१ हजार तीनशे रुपयांनी तिने त्यांच्याकडून लुबाडले.या आधी अशाच एका फसणुकीच्या प्रकारात रोशनीवर गुन्हा दाखल झाला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !