पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा (खुर्द)शे तात रोवणीचे काम करीत असताना वीज पडून दोघे जखमी.
एस.के.24 तास
पोंभूर्णा : शेतात रोवणीचे काम करीत असताना दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने पावसापासून वाचण्यासाठी शेतातील मोहाच्या झाडाखाली थांबलेले दोघे जण झाडावर वीज कोसळल्याने गंभीर जखमी झाले.
सिंधु गजानन सोमनकार वय,55 वर्ष रा.देवाडा खुर्द मुर्लीधर केशव सोमनकार वय,45 वर्ष रा.देवाडा खुर्द असे जखमी झालेल्यांचे नाव आहे.सदर घटना मंगळवारी (दि.22) मंगळवारी दुपारी 4:00. वाजता च्या सुमारास घडली.
देवाडा खुर्द येथे रोवणीचे काम सुरू आहे.मंगळवारी दुपारी पाऊस सुरू झाला.सिंधु सोमनकार व मुर्लीधर सोमनकार शेतातील मोहाच्या झाडाखाली थांबले होते.